Press "Enter" to skip to content

खारघर महोत्सव : मयुर घरत ठरला “नगरसेवक श्री ” चा मानकरी !

कोकण दर्पण: खारघर महोत्सव शरीरसौष्ठव स्पर्धेतील “नगरसेवक श्री २०१९” मानकरी मयुर घरत ठरला. त्याला ११ हजार रोख , सन्मान चिन्ह आणि मानाचा पट्टा देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि रायगड जिल्हा बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या सहकार्याने खारघर जिमखाना यांच्या वतीने आणि नगरसेवक गुरुनाथ गायकर , उपसरपंच संतोष गायकर यांच्या पुढाकाराने खारघर महोत्सवमध्ये शनिवारी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २५० स्पर्धक सहभागी झाले होते.

५५ वयोगटातील स्पर्धेत नवनाथ गावडे, ६० वयोगटात योगेश पाटील,६५ वयोगटात सुरेश भातले, ७० वयोगटात हरेश साळुंखे, तर ७० वरील गटात मयूर घरत विजेते ठरले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »