Press "Enter" to skip to content

खारघरचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे खारघर महोत्सव – आमदार बाळाराम पाटील !

खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघरचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे खारघर महोत्सव असे प्रतिपादन आमदार बाळाराम पाटील यांनी खारघर येथे केले.
खारघर येथे सुरु असलेल्या खारघर महोत्सवाला आमदार बाळाराम पाटील यांनी भेट दिली. खारघर जिमखाना अँड स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने तसेच नगरसेवक गुरुनाथ गायकर आणि माजी उपसरपंच संतोष गायकर यांच्या पुढाकाराने २२ डिसेंबर पासून खारघर महोत्सवाचा जल्लोष खारघर मध्ये सुरु आहे. नृत्य , संगीत, गायन ,कला आणि विविध गुणांचा अविष्कार करणारा हा सोहळा खारघरच्या सांस्कृतिक वाटचालीत भर टाकणारा आहे. आमदार बाळाराम पाटील यांनी यानिमित्ताने आयोजकांचे कौतुक केले आणि शुभेच्या दिल्या.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »