खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर महोत्सवामध्ये होम मिनिस्टर खारघर तसेच मिस आणि मिसेस खारघर या स्पर्धेचे विशेष आकर्षण आहे. १ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता होम मिनिस्टर खारघर हि स्पर्धा होणार असून विजेत्या महिलेला पैठणी भेट दिली जाणार आहे. त्यामुळे खारघर महोत्सवातील पैठणीची स्पर्धा मोठी रंगतदार ठरणार आहे.
३० डिसेंबर रोजी मिस आणि मिसेस खारघर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. होम मिनिस्टर खारघर तसेच मिस आणि मिसेस खारघर या स्पर्धा खारघर मधील गृहिणी तसेच युवा -युवतींसाठी पर्वणी ठरणार आहे. इच्छयुक स्पर्धकांनी आपली नावे पूनम गायकर ८८५०८२६६६३, अश्विनी शिरोडकर ९०२२७०५२५८ यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन आयोजक नगरसेवक गुरुनाथ गायकर आणि माजी उपसरपंच संतोष गायकर यांनी केले आहे.
कोकण दर्पण .





