Press "Enter" to skip to content

सत्याग्रह कॉलेजच्या वतीने भारतीय संविधान वाटप !

खारघर , खारघर येथील सत्याग्रह कॉलेजच्या वतीने भारतीय संविधान तसेच बुद्धरुप व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्य सेनानी रामराव हरिराव गुरुजी यांच्या २५ व्या सर्मूतिदिनानिमित्त सत्याग्रह कॉलेजमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्याग्रह कॉलेज पाली व बुद्धिझम विभागाद्वारे त्रिपिटक गाथा वाचन स्पर्धा घेण्यात आली होती. त्यातील विजेत्यांना भारतीय संविधान तसेच बुद्धरुप व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म , प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ एस पी गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ जी के डोंगरगावकर यांनी मार्गदर्शन केले.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »