Press "Enter" to skip to content

नगरसेविका संजना कदम यांची कार्यवचनपुर्ती ! वास्तूविहार सेलिब्रेशन रस्त्यांची दुरुस्ती !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर प्रभाग सहा मधील वास्तूविहार सेलिब्रेशन रस्त्यांची दुरुस्ती करून नगरसेविका संजना समीर कदम यांनी आपल्या कार्याची वचनपूर्ती केली आहे.

विभागातील सेक्टर १६,१७ वास्तूविहार सेलिब्रेशन मधील रस्त्याची दुरावस्था झाली होती. रहिवाशांच्या वारंवार तक्रारी नंतर नगरसेविका संजना समीर कदम यांनी सिडकोकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार करून रस्त्याचे काम सुरू करून घेतले. पनवेल महानगरपालिका नगरसेविका संजना समीर कदम यांच्या हस्ते प्रथम श्रीफळ वाढवून रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. त्या प्रसंगी उपस्थित नगरसेवक निलेश बाविस्कर , रायगड जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा समीर कदम , भाजपा व वास्तूविहार मधील मनोहर पाटोळे, योगेश जोशी, अनिल बोरे, शेखर कदम, पालवे काका, शिंदे काका, सुशांत पाटोळे, राजू अचलकर, जयेश माने, ईश्वर पालवे ज्ञानेश्वर सोरटे, पाटील, व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »