पनवेल : केंद्र सरकारने नुकताच मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ शेकडो खारघरवासी रस्त्यावर उतरून शांततेत कायद्याचे समर्थन केले.भारत रक्षा मंचच्या बिना गोगरी यांच्या पुढाकाराने या समर्थन अभियानाचे आयोजन रविवारी शिल्प चौकात करण्यात आले होते.
यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी नागरिकत्व सुधार कायद्याचे आम्ही स्वागत करतो अशा आशयाचे फलक या अभियानामध्ये झळकताना दिसले.एकीकडे देशभरात या कायद्याच्या विरोधात काही संघटना निदर्शन करीत आहेत.मात्र हा कायदा देशहिताचा असुन त्याचे स्वागत करणे गरजेचे असल्याने या समर्थन अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे गोगरी यांनी सांगितले.आमदार प्रशांत ठाकुर यांनी देखील हा कायदा देशहिताचे असल्याचे सांगत या कायद्याच्या समर्थनाची गरज असल्याचे सांगितले.यावेळी मोठ्या संख्यने महिला वर्ग या अभियानात सहभागी झाले होते.यावेळी उपस्थितांमध्ये स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील,जेष्ठ नगरसेवक अभिमन्यू पाटील,नगरसेविका लीना गरड,नगरसेवक रामजी बेरा,नगरसेवक निलेश बाविस्कर,बीना गोगरी,शिवम सिंह, शुभम व्यास,जयेश गोगरी,संदिप देशमुख, भावेश अंकोलिया आदीसह मोठ्या संख्येने खारघरवासी उपस्थित होते.
भारत रक्षा मंच,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद,भारत विकास परिषद इत्यादी संघटनानांच्या संयुक्त विद्यमाने ही एकत्रीकरण सभा आयोजित करण्यात आली होती. बीना गोगरी, शिवम सिंह, शुभम व्यास, जयेश गोगरी, संदिप देशमुख, भावेश अंकोलिया
नवीन शर्मा, विक्रम सिंह, ह्यांच्या पुढाकाराने ही सभा यशस्वीरित्या पार पडली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकुर , ब्रीजेश पटेल, प्रवीण पाटील, विजय पाटील, संध्या शारबिद्रे, किरण पाटील, सचिन वास्कर मोना अडवाणी, साधना पवार, विपुल चोटलीया, दिलीप जाधव, लखविन्दर सिंग सैनी, भरत कोंडाळकर, राजेश शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण दर्पण.





