Press "Enter" to skip to content

खारघर महोत्सव ! `संस्कृती महाराष्ट्राची `कार्यक्रमाद्वारे खारघरवासियांना मिळाली सांस्कृतिक मेजवानी !

खारघर,कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर महोत्सवामध्ये आयोजित केलेल्या संस्कृती महाराष्ट्राची या संगीतमय कार्यक्रमाद्वारे खारघरवासियांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली. नृत्य आणि गीत संगीताचा अविष्कार असलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली.

खारघर महोत्सवातील २२ डिसेंबरचा दिवस मोठा उत्साहाचा ठरला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खारघर महोत्सवाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी अग्रणीची होती. त्यातच संस्कृती महाराष्ट्राची या सांस्कृतिक गीत संगीताच्या कार्यक्रमाने भर टाकल्याने खारघर महोत्सवाची रविवारची रंगत वाढली. संस्कृती महाराष्ट्राची या कार्यक्रमातील कलाकारांनी गीत संगीताच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राची संस्कृती सादर केली. प्रेक्षकांनी देखील मोठी दाद दिली. खारघरचा सांस्कृतिक वारसा खारघर महोत्सव जपेल ,असा विश्वास आयोजक तथा नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »