खारघर, कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर महोत्सवामध्ये आयोजित केलेल्या गीत-गायन स्पर्धेत गायक कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २० डिसेंबर पासून खारघर मध्ये खारघर महोत्सवाचा मोठा जल्लोष सुरु आहे. शनिवारी झालेल्या गीत गायन स्पर्धेमध्ये अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. पोवाडा , भारूड , भक्तीगीत , सिनेमा गीते सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सुप्रसिद्ध निवेदक विनय मोरे यांनी या कार्यक्रमात आणखी जान आणली.
२० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान होणाऱ्या खारघर महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गायन स्पर्धेतील विजेत्यांना पनवेल महापालिकेचे विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.खारघर जिमखाना अँड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्या पुढाकाराने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण दर्पण.





