खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर जिमखाना अँड स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गुरुनाथ गायकर आणि माजी उपसरपंच संतोष गायकर यांच्या पुढाकाराने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या खारघर महोत्सवाचा मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. खारघर महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. खारघर मधील हा दिमाखदार सोहळा खारघरवासीयांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.
खारघर डी मार्ट समोरील मैदानात २० डिसेंबर रोजी सुरु झालेला खारघर महोत्सव १ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे. २० डिसेंबर रोजी खारघर महोत्सवाचे भव्य उदघाटन करण्यात आले. यावेळी शेकापचे नेते तथा माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे , पनवेल महापालिकेचे विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे ,पोलीस उपायुक्त अशोक दुधे ,नगरसेवक हरेश केणी ,प्रमोद भगत, बबन मुकादम , विनोद पटेल, अशोक मोरे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राचार्य बी ए पाटील , खारघर अध्यक्ष बळीराम नेटके ,गणेश कडू ,शेकापचे नेते अजित अडसुळे , कोकण दर्पणचे संपादक संजय महाडिक , जनसभाचे संपादक अप्पासाहेब मगर , सामाजिक कार्यकर्ते जगदीश घरत ,आयोजक नगरसेवक गुरुनाथ गायकर , माजी उपसरपंच संतोष गायकर आदी उपस्थित होते.
विविध कार्यक्रमांची मेजवाणी असलेला खारघर महोत्सव खारघरवासीयांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. महोत्सव कला गुणांचा ,महोत्सव संस्कृतीचा ,महोत्सव नात्यांचा ,महोत्सव आपल्या खारघरचा असे ब्रीद वाक्य घेऊन या महोत्सवाची वाटचाल सुरु आहे. खारघर जिमखाना अँड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्या पुढाकाराने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.खारघर महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.यावर्षी देखील विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.गीतगायन स्पर्धा , मिस आणि मिस्टर खारघर, नृत्य स्पर्धा , आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघरवासियांनी मोठ्या संख्येने खारघर महोत्सवात सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा आनंद लुटावा ,असे आवाहन नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी केले आहे.
कोकण दर्पण.






