Press "Enter" to skip to content

खारघरची सांस्कृतिक ओळख सांगणारा “खारघर महोत्सव“ ! खारघर जिमखान्याच्या वतीने भव्य आयोजन ! २० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान होणार महोत्सव ! नगरसेवक गुरुनाथ गायकर यांचा पुढाकार !

खारघर ,कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर जिमखाना अँड स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने खारघर येतेच भव्य खारघर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर डी मार्ट समोरील मैदानात २० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान सदर महोत्सव होणार आहे. खारघर जिमखाना अँड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्या पुढाकाराने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघरची सांस्कृतिक ओळख सांगणारा हा खारघर महोत्सव आहे ,अशी प्रतिक्रिया आयोजक गुरुनाथ गायकर यांनी कोकण दर्पणशी बोलताना दिली.

विविध कार्यक्रमांची मेजवाणी असलेला खारघर महोत्सव खारघरवासीयांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते २० डिसेंबर रोजी खारघर महोत्सवाचे भव्य उदघाटन करण्यात येणार आहे.

विविध कार्यक्रमांची मेजवाणी असलेला खारघर महोत्सव खारघरवासीयांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते २० डिसेंबर रोजी खारघर महोत्सवाचे भव्य उदघाटन करण्यात येणार आहे.

महोत्सव कला गुणांचा ,महोत्सव संस्कृतीचा ,महोत्सव नात्यांचा ,महोत्सव आपल्या खारघरचा असे ब्रीद वाक्य घेऊन या महोत्सवाची वाटचाल सुरु आहे. खारघर जिमखाना अँड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक गुरुनाथ गायकर यांच्या पुढाकाराने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.खारघर महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.यावर्षी देखील विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.गीतगायन स्पर्धा , मिस आणि मिस्टर खारघर, नृत्य स्पर्धा , आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खारघर महोत्सवामधील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी पूनम गायकर ८८५०८२६६६३, अश्विनी शिरोधर ९०२२७०५२५८ , सुदर्शन नाईक ९८६९४१०९७६ यांच्याशी संपर्क साधावा ,असे आवाहन नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी केले आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »