खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : अखेर सिडको प्रशासनाला आली जाग आली आहे. खारघर सेक्टर १५, १६, १७ व १८ परिसरातील खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. स्थानिक नगरसेविका संजना कदम यांनी आठ महिन्यापासून सिडको प्रशासनाचा पाठपुरावा केल्यानंतर सिडको प्रशासनाला जग आली आहे. दरम्यान , दुरुस्त केलेले रस्ते फार काळ टिकत नाहीत, काम कमी गुणत्तेचे होत असल्याने खारघरामधील रस्ते वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे येथील रस्त्याचे काम दर्जेदार होईल का ? असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे.
दम्यान , यावेळी स्थानिक नगरसेवक निलेश बाविस्कर , भाजप नेते समीर कदम ,भाजप नेते मुकेशजी तसेच रहिवाशी उपस्थित होते.
खारघर सेक्टर १५, १६, १७ व १८ मधील रस्ते महानगर गॅस कंपनीने सात ते आठ महिन्यापासून खोदलेले होते. सदर रस्ते बनविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती समीर कदम यांनी दिली तर रस्ते दर्जेदार देण्याची जबाबदारी सिडकोने पार पाडावी , अशी अपेक्षा निलेश बाविस्कर यांनी व्यक्त केली.
कोकण दर्पण .





