पनवेल(प्रतिनिधी) नोव्हेंबर २०१८ मध्ये स्थापन झालेल्या टर्शरी पेडिअट्रि कार्डिअक केयर (बालरोग हृदयरोग सेवा) आणि सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केयर अँड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिअक स्किल्सने आज (२६ नोव्हेंबर) आपला पहिला वर्धापनदिन यशस्वीपणे पूर्ण केला. वर्धापनदिन सादरा करण्यासाठी तसेच १०० पूर्णपणे मोफत आणि यशस्वी हृदयशस्त्रक्रिया सादऱ्या करण्यासाठी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्राद्वारे आतापर्यंत ७५०० लहान मुले आणि ५५० गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली असून स्थापनेनंतरच्या केवळ एका वर्षात साध्य करण्यात आलेली ही कामगिरी निश्चितच असामान्य आहे. यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आलेल्या लहान मुलांना मान्यवरांच्या हस्ते गिफ्ट ऑफ लाइफ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. भारतरत्न सचिन तेंडुलकर, पंडित शिवकुमार शर्मा, श्री हरीहरन, शनवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव यांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे देण्यात आली. मोफत शस्त्रक्रिया झालेल्या लहान मुलांचे पालक भारावून गेले होते. त्यांना शस्त्रक्रियांबरोबरच वास्तव्य आणि खाण्याच्या सोयीही मोफत देण्यात आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, या सर्वांवर अतीव प्रेमाचा वर्षावही करण्यात आला असल्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. त्यानंतर गिफ्ट ऑफ लाइफ ही संकल्पना मांडणारे सांस्कृतिक नृत्य नाट्य यावेळेस सादर करण्यात आले. श्री सत्य साई संजीवनी सेंटर्सचे कामकाज श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टद्वारे केले जात असून नया रायपूर, पालवाल आणि नवी मुंबई येथील केंद्रे गरजूंना जात, धर्म आणि राष्ट्रीयत्व कोणतेही असले, तरी पूर्णपणे मोफत सेवा पुरवत आहेत. या केंद्रांनी आतापर्यंत ‘आयुष्याचा सन्मान’ राखला असून भारताच्या ३० राज्यांतील आणि १० विकसनशील देशांतील १० हजार लहान मुलांवर हृदयशस्त्रक्रिया करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. आमच्या केंद्रांचा महत्त्वाचा आणि पवित्र पाया म्हणजे करुणा आहे. प्रेम हे विपुल असते आणि ते श्री सत्य साई संजीवनी सेंटर्समध्ये ठळकपणे दिसून येते. त्याने या तिन्ही केंद्रांना खऱ्या अर्थाने ‘उपचारांचे मंदिर’ बनवले असून काळजीवाहू आणि लाभार्थी अशा दोघांनाही पवित्रता आणि परिपूर्णता प्रदान केली आहे. श्री सत्य साई संजीवनी सेंटरचे कामकाज हाताळणारे श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सी. श्रीनिवास यांनी याप्रसंगी स्वागतपर भाषण केले. ते म्हणाले, की ‘नवी मुंबई केंद्राद्वारे महाराष्ट्रातील लहान मुले आणि नागरिकांची सेवा करायला मिळणे हे सत्य साई संजीवनीचे भाग्य आहे.’ या केंद्राद्वारे सर्वांना मोफत सेवा दिली दाते. दया आणि कौशल्य हा संजीवनीचा मंत्र आहे.’

श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केयर अँड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिअक स्किल्स यांचा पहिला वर्धापन ! भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा उत्साहात
- माणगाव घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल ! शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु ! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची माहिती !
- पत्रकार परिषद ! माणगाव 10 लाख खंडणी प्रकरण ! पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ! माणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची चौकशी करा ! मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे शरद सावंत यांची मागणी !
- सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त कुटुंब’ संकल्पगुढी; ढोलताशा-लेझीम, महाराष्ट्रीयन पोशाखातील रॅम्प वॉकने नववर्षाचा उत्सव रंगला




