भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देषाला अर्पण केलेले संविधान हे जगातील सर्वश्रेश्ठ असून त्याआधारे भारताला पुर्नवैभव लवकरच मिळेल असे प्रतिपादन अमेरिकेतील विचारवंत क्रांती खेम्मा यांनी केले.
खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान रॅलीच्या षुभारंभा प्रसंगी ते बोलत होते. उत्सवचैक ते सेक्टर 19 मधील सत्याग्रह मैदान पर्यंत ही रॅली काढण्यात आली होती.
क्रांती खेम्मा म्हणाल्या, भारतीय संविधानामध्ये समाजातील सर्व घटकांचा आर्थिक व सामाजिक विकासासाठी तरतुद आहे. या संविधानामुळेच विषेशतः देषातील कमकुवत वर्गांना विकासाच्या प्रक्रियेत विषेश संधी मिळाली आहे. सरकारने संविधान जागृतीसाठी सर्व षाळा आणि महाविद्यालयाला संविधान जागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत दिलेले निर्देष हे योग्य आहे. त्यानुसार या संस्थेद्वारे पालकांसाठी संविधान पाठषाळा सुरू केल्याबद्दल सत्याग्रह महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जी.के.डोंगरगांवकर यांचे खेम्मा यांनी कौतुक केले.
समारोप प्रसंगी डाॅ. डोंगरगांवकर म्हणाले, भारतीय संविधानाने भारतातील तमाम नागरिकांना दर्जा आणि संधित समानता हे सुत्र भारताला प्राचीन कालीन वैभवषाली भारत निर्मीतीचा अजेंडा आहे. भूतकाळातील सामाजिक परंपरा व प्रथा या संविधानासी विसंगत असल्यास त्याची सोड चिठ्ठी देणे हे नागरीकांचे कर्तव्य आहे. संविधानापेक्षा धर्म मोठा नाही. संविधान हे सर्व श्रेश्ठ आहे आणि भारतातील सर्व नागरीक हे प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेष सर्वाना मार्गदर्षनीय आहे.
या रॅलीमधील विभागातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. वाजंत्री विद्यार्थी, संविधान हाती घेतलेल्या विद्यार्थीनी, छ.षिवाजी महाराज, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या पोशाखातील मुलांनी अनेकांचे लक्ष वेधुन घेतले होते. भारतीय संविधानाचा विजय असो या घोशनेने विद्याथ्र्यांनी परिसर दनानून सोडला होता.
सिध्दार्थ मल्टिपरर्पज् रेसिडेन्षल हायस्कुल, डाॅ.नेल्सन मंडेला निवासी आश्रम षाळा, अजंेठा इंटरनॅषनल स्कूल, सत्याग्रह काॅलेज, सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय, डाॅ.जी.के.डोंगरगांवकर षाळेतील विद्यार्थी षिक्षक मोेठया संख्येने सहभागी झाले होते.

भारताचे संविधान भारताला पुर्नवैभव प्राप्त करून देणारा अजेंडा – अमेरिकेचे विचारवंत क्रांती खेम्मा यांचे प्रतिपादन
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भव्य पदयात्रा उत्साहात
- माणगाव घटनेप्रकरणी दोन्ही गटांवर क्रॉस गुन्हे दाखल ! शरद सावंत यांच्या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून तपास सुरु ! वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची माहिती !
- पत्रकार परिषद ! माणगाव 10 लाख खंडणी प्रकरण ! पोलीस अधिकाऱ्यांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ! माणगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांची चौकशी करा ! मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांकडे शरद सावंत यांची मागणी !
- सोनखार-पामबीचमध्ये ‘संयुक्त कुटुंब’ संकल्पगुढी; ढोलताशा-लेझीम, महाराष्ट्रीयन पोशाखातील रॅम्प वॉकने नववर्षाचा उत्सव रंगला




