Press "Enter" to skip to content

खारघर पोस्ट ऑफिस घरकुल संकुलात स्थलांतरित करण्याची मागणी !

खारघर , कोकण दर्पण वृत्तसेवा : खारघर पोस्ट ऑफिस घरकुल संकुलात स्थलांतरित करण्याची मागणी खारघर भाजपासाने सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन सिडको अध्यक्षांना देण्यात आले.
भाजपा खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल , नगरसेवक निलेश बाविस्कर , उपाध्यक्ष दिलीप जाधव , सचिव विपुल चौटालिया , महिला मोर्चा सरचिटणीस मोना अडवाणी यांच्या शिष्ठमंडळाने सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली व सदर निवड दिले.

खारघर सेक्टर ४ मध्ये खारघर पोस्ट ऑफिस कार्यरत आहे. सदर पोस्ट ऑफिसची जागा हि तोकडी असल्याने पोस्ट ऑफिस खारघर सेक्टर १५ मधील घरकुल संकुलात असलेल्या सिडको कम्युनिटी सेंटर मध्ये स्थलांतरित करावे , अशी खारघरवासियांची जुनी मागणी आहे. मात्र या मागणीकडे संबंधित प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने भाजपच्या शिष्ट मंडळाने सिडको अध्यक्षांची भेट घेऊन पोस्ट ऑफिसच्या कमी जागेमुळे होणाऱ्या गैरसोयी बाबत नागरिकांची व्यथा मांडली.
सेक्टर ४ येथील पोस्ट आँफिसची जागा अत्यंत लहान असून २५ हुन अधिक कर्मचारी सर्व असुविधा असताना कार्यरत राहून सेवा देत असतात.सदर पोस्ट आँफिस मध्ये येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला ऊन पाऊस सहन करीत बाहेर प्रचंड मोठ्या रांगेमध्ये तासन् तास उभे राहतात.या साऱ्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी सदर पोस्ट ऑफिस घरकुल येथे हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत सिडको व्यवस्थापकिय संचालक लोकेश चंद्रा यांना देखील निवेदन दिल्याची माहिती अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »