बदलत्या परिस्थितीनुसार मेडिकल क्षेत्रासमोर देखील मोठी आव्हाने आहेत. या स्पर्धेपासून जीव वाचविणारे डॉक्टर देखील उपवाद ठरले नाहीत. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन आव्हाने पेलण्यासाठी डॉक्टरांनी “टीम वर्क“करावे, टिमवर्कद्वारे रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा देता येईल आणि वैद्यकीय व्यवसायाला देखील वाव मिळेल ,असे मत शुश्रूषा हार्टकेअर सेंटरचे वैद्यकीय संचालक तथा जेष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ संजय तारळेकर यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केले.
डॉ संजय तारळेकर पुढे म्हणाले आज नवी मुंबई सारख्या ठिकाणी हॉस्पिटल चालविणे आव्हानाचे झाले आहे.मेडिकल क्षेत्रात नवीन आलेल्या डॉक्टर पिढीने हे आव्हान समजून घेतले पाहिजे. डॉ तारळेकर यांनी यावेळी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले आम्ही जेव्हा नेरुळ मध्ये मेडिकल सेवा सुरु केली तेव्हा मोठं हॉस्पिटल नव्हतं . कमी जागेत नेरूळला सुरुवात केली. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नवीन गोष्टी शिकल्या. निष्ठा , सातत्य , प्रामाणिकपणे २५ वर्षात रुग्णाची चांगली सेवा केली.तेव्हा कुठे रुग्ण आणि आमचे एक डॉक्टर म्हणून नातं निर्माण झालं.
पण मेडिकल क्षेत्रात नवीन आलेले डॉकटर त्यांच्यापुढे नवीन आव्हाने आहेत हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. एकदा नवीन वैद्यकीय व्यवसाय सुरु केला कि मोठी आव्हाने आहते. आता नव्या समाजाला वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान आहे. त्यामुळे रुग्णाला हाताळणे मोठे आव्हान आहे. डॉक्टरांचा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी सवांद महत्वाचा आहे. रुग्णाच्या रोगाचे निदान करणे महत्वाचे आहे . क्रिटिकल सुविधांचे हॉस्पिटल चालविणाऱ्यासमोर हे मोठे आव्हान आहे. सरकारचे देखील नियंत्रण आहे.
डॉक्टर जास्त पैसे घेतात हि समाजात मोठी ओरड सुरु आहे. आता हि परिस्थिती डॉकटर कसे हाताळतात हे महत्वाचे आहे . अशा वेळी रुग्णाला किव्हा त्याच्या नातेवाईकांना समजावणे ,मानसिक दृष्टया तयार करणे , त्यांना समजावणे , त्यांना माहिती देणे , त्यांना त्याबाबत ज्ञान देणे करणे गरजेजे आहे , हे मोठे आव्हान नव्या पिढीच्या डॉक्ट्रांपुढे आहे हे समजून घेतले पाहिजे.
रुग्णाशी संवाद आणि त्याचे ज्ञान समजून घेतले पाहिजे.
नव्या आव्हानाला पुढे जाण्यासाठी तज्ज्ञ डॉक्तरांच्या ग्रुपने एकत्र आले पाहिजे . एकत्र काम केले पाहिजे . रोगाचे निदान करण्यासाठी चर्चा करावी . टीम वर्कद्वारे उत्तम काम होते.उत्तमारोग्य सुविधा देता येते. अशा वेळी डॉक्टरांनी दुसरा डॉकटर आपला स्पर्धी नाही तर आपला सहकारी आहे , हि मानसिकता तयार करण्याची गरज आहे. यातून रुग्णाला चांगली सेवा मिळेल आणि वैधकीय व्यवसाय देखील वाढेल. टीम वर्क महत्वाचे आहे. पुढे स्वतंत्र हॉस्पिटल चालविणे नवीन पिढीला आव्हान आहे.
ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार दिसतात. शहरी भागात तसे फारसे घडत नाही. ग्रामीण भागात रुग्णांना किव्हा त्याचे नातेवाईकांना अज्ञानी मानणे हे चुकीचे आहे. क्रिटिकल मॅनेजमेंट मध्ये काम करणाऱ्या डॉक्टरनपुढे जास्त आव्हान आहे. बऱ्याच वेळा रुग्णांना सांगताना योग्य संवाद महत्वाचा आहे. ती चर्चा व्हिडीओ रेकॉर्डिंग करावी. एक प्रूफ म्हणून नव्हे तर एक विश्वासहर्ता म्हणून महत्वाचे आहे. अनेकवेळा आपण रुग्णाच्या नातेवाईकाची स्वाक्षरी घेतो.यातून गैरसमज होऊ शकतो.
वैधकीय उपचार घेताना रुग्णाची आर्थिक परिस्थिती जाणून घेणे महत्वाचे आहे. अनेक रुग्ण उपचारानंतर पैसे देत नाही. त्यामुळे त्या एका रुग्णामुळे इतर दहा रुग्णांवर दुर्लक्ष होता काम नये. वैद्यकीय क्षेत्रातील हे एक आव्हान म्हणूनच पहावे,असे डॉ संजय तारळेकर म्हणाले.
संकलन : संजना महाडिक
————————————————————————————————





