Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : सानपाडा आणि नेरुळ मध्ये अशोक गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांच्या सानपाडा आणि नेरुळ मधील झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्खी नवी मुंबई दुमदुमली.

सानपाडा आणि नेरूल मध्ये महिला रॅली चे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. घरातील महिला एका विचारांच्या पाठीशी राहते तेव्हा ती सर्व कुटुंब त्या विचाराने पुढे नेत असते. पवारसाहेबांनी महिलांना दिलेला हक्क आणि महिलांनी त्यांच्या विचारांनी चालण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच याठिकाणी परिवर्तन घडवून आणल्या शिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया अशोक गावडे यांनी यावेळी व्यक्त केली.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »