नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांच्या विजयासाठी लागीरं झालं जी कलाकारांची टीम मैदानात उतरणार आहे. अशोक गावडे यांच्या प्रचारासाठी आज बेलापूर विधानसभा क्षेत्रात आयोजित केलेल्या भव्य रोड शो मध्ये हे सर्व कलाकार सहभागी होणार आहेत.
आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता वाशी शिवाजी चौक येथून सदर रोड शो ला आरंभ होणार असून सानपाडा जुईनगर नेरूळमार्गे बेलापूरला पोहचणार आहे. या रोड शो द्वारे राष्ट्रवादीचे जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे.
कोकण दर्पण .




