पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : भारतीय जनता पक्ष आणि रायगड जिल्हा कोळी महासंघाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. या वेळी कोळी महासंघाने आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. या सभेस आमदार रमेश पाटील, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, अॅड. चेतन पाटील, प्रभाग क्रमांक २० चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, भालचंद्र वालसेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि आमदार रमेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कोकण दर्पण





