Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीला उदंड प्रतिसाद !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा मतदार संघात भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यअनुषंगाने त्यांच्या प्रचारार्थ पनवेल, खांदा कॉलनी आणि कामोठे परिसरात बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पनवेल विधानसभा मतदार संघातील पनवेल शहर, कामोठे आणि खांदा कॉलनी येथे भाजप, शिवसेना आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराथर बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ्नटर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, आरपीआय कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंय पगडे, प्रभाग समिती अध्यक्ष संजय भोपी, गोपीनाथ भगत, तेजस कांडपीळे, नगरसेवक संतोष शेट्टी, समिर ठाकूर, एकनाथ गायकवाड, अॅडव्होकेट मनोज भुजबळ, डॉ्नटर अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, नितीन पाटील, नगरसेविका वृषाली वाघमारे, सुशीला घरत, सिताताई पाटील, दर्शना भोईर, राजेश्री वावेकर, अरुणा भगत, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, माजी नगराध्यक्ष भाजपनेते संदीप पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के.के.म्हात्रे, भाजपनेते जगदीश घरत, युवानेते हॅप्पी सिंग, युवामोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजपनेते सुधाकर पाटील, रमेश तुपे, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, महिला मोर्चाच्या आशा भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकण दर्पण