Press "Enter" to skip to content

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना उत्तर भारतीयांच्यावतीने मतांची आघाडी देणार – निशा सिंग !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : सर्व समाजाचा विचार करणारे आणि सर्वाना मानसन्मान देणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना उत्तर भारतीयांच्यावतीने मतांची आघाडी मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन उत्तर भारतीय सेलच्या शहर अध्यक्षा निशा सिंग यांनी केले.
पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरातून जोरदार पाठींबा मिळत आहे. समाजातून आमदार प्रशांत ठाकूर यांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी उत्तर भारतीयांच्या माध्यमातून आपण प्रयत्नशिल असून त्या अनुषंगाने उत्तर भारतीय आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत, असे सिंग सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामे पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरली, त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव राज्यभरात झाला आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबूकमधील ते असल्याने त्यांचा पनवेललाच नाही तर रायगड जिल्ह्याला अभिमान वाटतो. आमदार प्रशांत ठाकूर सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तीमत्व आणि दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जात पंत धर्म पंथ न मानता माणुसकी हाच एक धर्म मानणारे ते आहेत, त्यांना सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा नेहमीच बघायला मिळाला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आमदार प्रशांत ठाकूर यांना यंदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामध्ये उत्तर भारतीय सुद्धा आपला वाटा मतांच्या आघाडीने देणार आहे, असे निशा सिंग यांनी ठामपणे सांगितले.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »