पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : उरण विधानसभा मतदार संघातील रिस येथील गणेश कॉलनीमधील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी उरणचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना जाहीर पाठिंबा दिला.
उरण मतदार संघातील बुलंद आवाज व डँशिंग नेते महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदार संघात शेकडो करोडो रुपयांची विकासकामे करून आपल्या दमदार कार्याची एक झलक दाखवली आहे. महेश बालदी आमदार झाल्यांनतर या मतदार संघात विकासाचा महामेरू धावणार आहे. त्यामुळे शिवसेना, शेकाप, काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणे रिस कॉलनी येथील वंदना लक्ष्मण खंदारे, दिपाली योगेश केंडे, जागृती ठोंबरे, अंजना सुर्वे, रोहिणी पवार, सुरेखा पोळ, पूनम पोळ, अनिता राठोड, मनिषा गुप्ता, वंदना कन्होजीया, ज्योती विचारे, दर्शना पवार यांनी पाठिंबा दिला.
कोकण दर्पण .





