Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये महायुतीची बैठक संपन्न !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेलमधील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीमधील नेत्यांची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
पनवेल विधानसभेतील महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर
यांच्या विजयासाठी महायुतीमधील नेते सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने हि बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य परेश पाटील यांच्यासह युतीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण दर्पण .