पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप, शिवसेना आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची हॉट्रीक करण्याच्या दृष्टीकोनातून विविध संस्था आपला जाहिर पाठींबा दर्शवत आहेत. त्याअंतर्गत अनेक संस्थांच्या पदाधिकार्यांनी आपला जाहिर पाठींबा पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केले.
लोकल चर्च पनवेल प्रोटेस्ट, अखिल भारतीय मातंघ संघ पनवेल, मल्टीमिडीया सामाजिक संस्था पनवेल, पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळ, कोकण विकास मंडळ नवीन पनवेल, मराठवाडा बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळ, गणेश टॅक्सी स्टॅन्ड खारघर, पनवेल तालुका हिंदु लोहार समाज यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला जाहिर पाठींबा दिला असून, त्या संदर्भातील पाठींबा पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील, रमेश पाटील, ज्येष्ठ नेते भिमसेन माळी, सुरेश फडके, संजय भगत, माजी सरपंच गुरुनाथ पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, मयुरेश खिस्मतराव, मराठवाडा बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष समाजभुषण उत्तमराव गायकवाड, सरचिटणीस अर्जुनराव गवळी, कोकण विकास मंडळाचे अध्यक्ष सुरेश आयरे, उपाध्यक्ष शेखर सावंत, उपसचिव अनंय इरमल, रमेश खाखटकर, जितेंद्र धनावडे, राजेंद्र जाधव, पनवेल तालुका निवृत्त सेवक मंडळाचे अध्यक्ष डी.बी.माळी, उपाध्यक्ष व्ही.एस.म्हात्रे यांच्यासह सदस्य, मल्टीमिडीया सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी दांगट, सचिव चंद्रकांत शिर्के, खजिनदार भुषण साळुंखे यांच्यासह संस्थेचे सदस्य, अखिल भारतीय मातंग संघाचे जिल्हा अध्यक्ष शंकर कुंडले, पनवेल तालुका अध्यक्ष शांताराम कोळी, इंदीरानगर अध्यक्ष प्रसुराम मातंगी यांच्यासह सदस्य, लोकल चर्चचे स्टिफन भिंगारे, सॅम्युअल भिंगारे, जयंत पारधे यांच्यासह सदस्य तसेच गणेश टॅक्सी स्टँड खारघरचे शाखा प्रमुख सचिन ठाकूर, पनवेल तालुका हिंदु लोहार समाजचे अविनाश मोरे, गणेश सोमासे, प्रविण मोरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण दर्पण





