नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : अंगाला घामाने चिंब करणारे कडक उन असो की मुसळधार पाउस असो भाजपा-शिवसेना-आरपीआय-रयतक्रांती-रासप-शिवसंग्राम महायुतीचे ऐरोली विधानसभा मतदार संघातील उमेदवार लोकनेते गणेश नाईक यांच्या निवडणुक प्रचाराचा जोश तसूभरही कमी झालेला नाही. महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कायकर्ते एकदिलाने उन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता प्रचारात उरतले आहेत. ऐरोली, रबाळे, गोठिवली, घणसोली, कोपरखैरणे आदी भागात आतापर्यंत प्रचार फेर्या दणक्यात संपन्न झाल्या. त्याला हजारोंची उपस्थिती लाभली. गरजेपोटीची घरे नियमित करणे, सिडको निर्मिती धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करुन रहिवाशांच्या डोक्यावरील अपघातांची तलवार दूर करणे आणि एसआरएच्या माध्यमातून झोपडपटयांचा विकास करणे या कामांना जिंकून आल्यावर आपले प्राधान्य राहिल, अशी ग्वाही लोकनेते नाईक यांनी या प्रचारफेर्यांमधून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हयात काम करण्याची एखादी जबाबदारी दिली तरी ती आपण पार पडू, असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कोपरखैरणे प्रचार फेरीप्रसंगी भाजपा जिल्हाध्मक्ष रामचंद्र घरत, माजी आमदार संदीप नाईक, शिवसेना उपशहर प्रमुख विजम माने, आरपीआमचे सिद्राम ओहाळ, मुवानेते वैभव नाईक, नगरसेवक शंकर मोरे, माथाडी कामगार नेते आणि माजी नगरसेवक रविकांत पाटिल, नगरसेविका लता मढवी,समाजसेवक भालचंद्र मढवी, नगरसेविका सामली शिंदे, समाजसेवक नारामण शिंदे, नगरसेविका संगीता म्हात्रे, समाजसेवक संदीप म्हात्रे आणि मुतिचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी गणेश नाईक यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. प्रचंड मतांनी त्यांचा विजय होणार आहे.
– विजय माने, शिवसेना उपशहरप्रमुख
आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आरपीआयचे सर्व कार्यकर्ते गणेश नाईक यांच्या प्रचारात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून येत्या २१ ऑक्टोबरला त्यांना मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत.
– सिद्राम ओहोळ, आरपीआयनेते
कोकण दर्पण





