Press "Enter" to skip to content

कल्याण पश्चिम विधानसभा : एमआयएमचे आयाझ मौलवी यांच्या प्रचारासाठी १४ ऑक्टोबर रोजी असदुद्दीन ओवेसी यांची तोफ कल्याणमध्ये धडाडणार !

कल्याण ,कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील एमआयएमचे उमेदवार आयाझ मौलवी यांच्या प्रचारासाठी १४ ऑक्टोबर रोजी असदुद्दीन ओवेसी यांची तोफ कल्याणमध्ये धडाडणार आहे. कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी येथील केडीएमसी मैदानात सायंकाळी सहा वाजता एमआयएमच्या वतीने भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभेला एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासह एमआयएमचे दिग्ग्ज नेते उपस्थित राहणार आहेत.

कल्याण पश्चिमचा गड जिंकण्यासाठी एमआयएमच्या तमाम कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित रहावे ,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान , कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात आयाझ मौलवी यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. दररोज होणाऱ्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कल्याणच्या विकासाठी जनता मला नक्की संधी देईल ,असा विश्वास मौलवी यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केला आहे.

कोकण दर्पण .