Press "Enter" to skip to content

कल्याण पूर्व विधानसभा : भाजप महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांनी केले उदघाटन !

कल्याण ,कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पूर्व महायुती उमेदवार गणपत गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जल्लोषात पार पडले. कल्याण पूर्व १४२ विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहून, महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला .कल्याण पूर्व, तिसगाव नाका तीसाई हाऊस येथील , उमेदवार गणपत गायकवाड यांच्या महायुतीच्या कार्यालयात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ठाणे जिल्हा पालक मंत्री, शिवसेना जिल्हा अध्यक्ष एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी सह असंख्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत या प्रचार कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले या प्रचार करायचा उद्घाटन समयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपत गायकवाड हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केले. खुद्द महाराष्ट्राचे सीएम आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला निमित्त आपल्या कल्याणात आल्याबद्दल विद्यमान कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, आणि आपण जास्तीत जास्त मताने निवडून येऊ अशी ग्वाही दिली .

कोकण दर्पण