कर्जत विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अक्रम खान यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्धघाटन संपन्न झाले.यावेळी कर्जत खोपोली मधील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
खोपोली शहरातील समाज मंदिर रोड या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे कर्जत मतदार संघातील अधिकृत उमेदवार अक्रम मोहम्मद इस्लाम खान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उमेदवार अक्रम खान यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कर्जत खालापूर सह खोपोली मधील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार अक्रम खान हे सुशिक्षित व अभ्यासू असल्याने त्यांना कर्जत खालापूर मतदार संघातील मतदार चांगल्या प्रकारे निवडून देतील असे वांचीतचे कार्यकर्ते विकी भालेराव बोले. तसेच शहरातील मोहनवाडी, सिद्धार्थ नगर, प्रकाश नगर, विहारी, भानावज बौद्धवाडा येथील सर्व समाजातील नागरिक अक्रम खान यांना मोठया प्रमाणात मतदान करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी चे युवा कार्यकर्ते नवीन गायकवाड यांनी या वेळी सांगितले. सदरील ठिकाणी
कर्जत खालापूर मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अक्रम मोहम्मद इस्लाम खान यांनी वचन नामा सादर करून कर्जत खालापूर तालुक्यात अनेक वर्षांपासून असलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम तसेच पाण्याच्या व चांगल्या रस्त्याच्या कायम समस्या असल्याने त्या प्रथम सोडविणार असल्याचे वचन या वेळी त्यांनी देली आहे.
तसेच वंचित बहुजन आघाडी मध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून सर्व कार्यकर्ते चांगल्या प्रकारे कामे करत असल्याचे अक्रम खान यावेळी सांगितले.
कोकण दर्पण .





