पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकाप , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय मित्र पक्ष महाआघाडीच्या उमेदवार हरेश केणी यांच्या प्रचारदौऱ्याला पनवेलमध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शेकाप आघाडीने ग्रामीण भागासह संपूर्ण पनवेल पिंजून काढले आहे. आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे , शेकापचे नेते काशिनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संपूर्ण पनवेलमध्ये प्रचार सुरु केला आहे.
पनवेल विधानसभा निवडणूकही शेकापच्या स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई आहे. आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरलो आहोत ,आता जनतेने सत्य ओळखून मतदान करावे ,असे आवाहन शेकाप नेते काशिनाथ पाटील यांनी केले आहे.
कोकण दर्पण.





