पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेलच्या विकासाचा नुसता देखावा करणाऱ्या सत्ताधार्यांना जनता नक्की धडा शिकवेल, असे रोकठोक प्रतिपादन शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेल येथे केले. पनवेल विधानसभा मतदार संघातील शेकाप , काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय मित्र पक्ष महाआघाडीच्या उमेदवार हरेश केणी यांच्या प्रचारासाठी पनवेल येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
पनवेलचे आमदार आणि सिडकोचे अध्यक्ष म्हणून जनतेची जी कामे व्हायला हवी होती ती झाली नसल्याचे बाळाराम पाटील म्हणाले. खारघर आणि कामोठे ग्रामपंचातीचा भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधितांना तुरुंगात टकण्याची भाषा केली होती , मात्र त्याच सदस्यांना भाजपने सामावून घेतले. त्यामुळे जनता भाजपचे राजकारण पाहून आहे, जनता आपला निर्णय नक्की देईल , असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शेकाप पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण दर्पण
कोकण दर्पण .





