Press "Enter" to skip to content

आमदारकीच पहिल काम हे अंतुलेंच्या आंबेतमध्ये करणार- विनोद घोसाळकर !

श्रीवर्धन , कोकण दर्पण वृत्तसेवा : श्रीवर्धन मतदार संघाचे शिवसेना भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार विनोद घोसाळकर यांनी आंबेत कोंड, आंबेत, संदेरी, संदेरी मोहल्ला, आमशेत, तळवडे,पानवे, नेवरुळ परिसरांत नागरिकांच्या सदिच्छा भेट घेतली यावेळी ग्रामस्थांनी आंबेतमध्ये अजून देखील असलेल्या समस्यांचा पाढा वाचला, अंतुले साहेबांनंतर आंबेत खाडीपट्टा विभागाला विकासासाठी कोणीही वाली नसल्याची खदखद व्यक्त केली व घराणेशाही मोडीत काढण्यासाठी मुस्लीम बांधवांसह नागरिकांनी विनोद घोसाळकर यांना जाहिर पाठिंबा दिला यावेळी आंबेतसह खाडीपट्टा विकासकामांचा बॅकलाॅग भरून काढत विकासाचे स्वप्न पाहणार्या खर्या अर्थाने अंतुले साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, शासनाच्या पैशाची लूटमार करणार्यांना घरी बसवण्यासाठी आपणाला नेहमीच आदर्श असणारे बॅरिस्टर अंतुले साहेब यांच्या आंबेतभूमित माझ्या आमदारकीचा पहिला विकासनिधी टाकून अंतुले साहेबांना खर्या अर्थाने मानवंदना देणार असून श्रीवर्धन विधानसभेसाठी आपल्याकडे विकासाचा अजेंडा असून तुमची सेवा करायची संधी द्या.भविष्यात सेना भाजपचीच सत्ता येणार असून श्रीवर्धनचा आमदार म्हणून मला निवडून द्या व श्रीवर्धनवर पुन्हा एकदा भगवा फडकवून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आपले अमूल्य मत देण्याचे आवाहन विनोद घोसाळकर यांनी केले.
यावेळी उपस्थित आप्पा विचारे, बंड्या विचारे, अकलाख डावरे, इक्बाल ठोकन, जगबार चरफरे, रझाक डावरे, शब्बीर रहाटविलकर, उमरसाब डावरे, नासीर अंतुले, मन्नार डावरे,दिलार डावरे, जुनेद ठोकन, अमित म्हामुणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोकण दर्पण