Press "Enter" to skip to content

मातोश्रीचे घरटे मारणाऱ्या तटकरेला घरी बसवा- अनंत गिते !

श्रीवर्धन , कोकण दर्पण वृत्तसेवा : श्रीवर्धन- म्हसळा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय-रासप- शिवसंग्राम- रयत क्रांती महायुतीचे उमेदवार डॉ. विनोदजी घोसाळकर यांना विजयी करून लोकसभेतील पराभवाचा बदला घ्या, आणि मंन्त्रीपदासाठी लाचार होणार्या, भ्रष्टाचाराच्या आरोपाला घाबरणार्या तटकरेला कायमचा घरी बसवा व शिवशाहीला मत द्या असे आवाहन शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार अनंत गीते यांनी केले. श्रीवर्धन – म्हसळा विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांचा मेळावा दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गीते यांनी घणाघाती भाषण करत सर्वांना कामाला लागायचे आवाहन दिले. लोकसभेत आपला पराभव झाल्यानंतर आपण सर्व विसरून गेलो. सध्याच्या राजकारणात भावनिक तसेच भाषणाला शून्य किंमत झाली आहे. मात्र यंदाची लढाई गणित मांडून सोडवावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवाराने मुंबईकरांना टारगेट केले होते. यावेळी मतदार आमिषाला भुलल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यांच्याकडे याची यादी आहे. त्यामुळे आपल्याला विधानसभेत जिंकायचे असेल तर तेव्हा केलेली चूक पुन्हा करता कामा नये. नुसत्या मुठ्या आवळुन जिंकता येणार नाही. होय,आपण जिंकणारच आहोत, घोसाळकर यांची विजय 100% असून याचा सर्वाधिक आनंद मला होईल असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी जिवाच रान करीन, नुसत्या भावना भडकावून निवडणूक जिंकू शकत नाही. मात्र सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या आरोपींच्या पापांचे वाटेकरी होऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.तर लोकसभेत माझा नव्हे तर शिवसेनेचा पराभव झाला असून रायगडचा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण विनम्रपणे ठरल्याचे सांगितले. राज्यात सर्वत्र शिवसेनेचे 18 खासदार विजय झाले असतानाच याठिकाणी आपण का बरं हरलो याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आता आपल्याला विधानसभेत याचा आपल्याला वचपा काढायचा असे सांगताच उपस्थितांनी व्याजासकट वचपा काढू असावा असे आश्वासन त्यांना दिले. घोसाळकर म्हाडा सभापती म्हणजेच त्यांना राज्यमंत्री दर्जा आहे. मात्र पक्षप्रमुखानी आदेश दिल्यानंतरही लोकसभेत ज्या ठिकाणी आपल्याला मताधिक्य मिळाले नाही या मतदारसंघात निवडणूक लढण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. आता लढाई आपल्या सर्वांची आहे. रायगडमधून जयंत पाटील व सुनील तटकरे याना हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. खरंतर या महाशय खासदाराची अजूनही सुटका झालेली नाही. प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे तो सारखा मातोश्रीवर घिरट्या घालत आहे असे सांगताच उपस्थित शिवसैनिकानी त्याच्या कमरेत लाथ घाला असे सांगितले. तेव्हा आता हे काम आपल्या सर्वांच्या मदतीने विनोद घोसाळकर करेल असे सांगतात सभागृहात एकच हशा पिकला. बांधवांनो, आपण सर्व शिवसेना या एकाच कुटुंबातील आहोत, आपला खरा शत्रू ओळखा, स्वतःची फसवणूक करू नका आपापसात लढू नका असे आवाहनही त्यांनी केले. तळा, म्हसळा, श्रीवर्धन येथील रस्ते-पाणी या समस्याची काय अवस्था आहे हे उघड्या डोळ्याने पहा. जिल्ह्याचा विकास फक्त शिवसेना-भाजपच्या राजवटीत झाला. आता वेळ आली आहे परिवर्तनाची, बांधवांनो, कोणत्याही ही परिस्थितीत श्रीवर्धन- म्हसळा मतदारसंघातून आपण सर्व महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांच्या पाठीशी निष्ठेने, विश्वासाने उभे राहून पापाच्या पैशाला हात लावणार नाही अशी शपथ घ्या विजय आपलाच आहे असे गीते यांनी सांगितले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन- म्हसळा मतदारसंघात भगवा फडकविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला . नवरात्रीच्या या पवित्र दिनी आई जगदंबेची शपथ घेऊन आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन केंद्रीय अवजड मंत्री ना अरविंद सावंत यांनी केले घोसाळकर यांच्या नावातच भरघोस आहे त्यामुळे त्यांना भरघोस मते मिळून रायगडावर भगवा फडकेल असेही त्यांनी सांगितले.तर आपल्याला श्रीवर्धन म्हसळा विभागाचा विकास करायचा असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी नक्कीच विजयी होईन व माननीय शिवसेना पक्षप्रमुखांना दिलेला शब्द खरा ठरवीन असा ठाम निर्धार विनोद घोसाळकर यांनी केला. याप्रसंगी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धन- म्हसळा मतदार संघात महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर प्रचंड बहुमताने विजयी होतील असे सांगितले.

कोकण दर्पण