Press "Enter" to skip to content

महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा कर्जतमध्ये झंझावाती प्रचार ! जनतेचा वाढता प्रतिसाद !

कर्जत , कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्जत विधानसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा कर्जतमधील प्रचारात झंझावात सुरु आहे. प्रचारा दरम्यान थोरवे यांना जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.

कर्जत खालापूर मतदार संघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महेंद्रशेट थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदार संघातील अनेक विभागातील मतदार शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत , त्यामुळे शिवसेनेची मतांची मोट वाढत चालली असून उमेदवार महेंद्रशेट थोरवे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत युतीचे उमेदवार महेंद्रशेट थोरवे यांच्या प्रचार फेरीच्या दरम्यान वारे कातकरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला .
यावेळी महायुतीचे उमेदवार महेंद्रशेट थोरवे यांच्या सोबत ,उप तालुका प्रमुख दिलीपशेठ ताम्हाणे, जयेश मोहिते, संदेश सावंत, रामचंद्र मिनमिने, योगेश दाभाडे, बाजीराव दळवी, मधुकर बोराडे, सुरज म्हसे, गोविंद म्हसे, सदानंद म्हसे
यांच्या उपस्थितीत
वारे कातकरवाडी येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शिवसेना मध्ये जाहीर प्रवेश झाला .त्यामुळे भगव्याची लाट चहूकडे पसरलेली दिसत आहे .

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »