कर्जत , कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्जत नगरपालिका हद्दीत राष्ट्रवादी कॉग्रेस, राष्ट्रीय कॉग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व समविचारी पक्षाच्या महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ नारायण लाड यांच्या प्रचारार्थ कर्जत मध्ये फेरी आयोजन करण्यात आले होते. या फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या प्रचारास विठ्ठल मंदिर व महालक्ष्मी मंदिर दहिवली येथून प्रचारास सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी राष्ट्रीय कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, धनंजय चाचड, विजय हरिश्चंदे, सुभाष मदन, राष्ट्रवादी कॉग्रेस महिला तालुका अध्यक्ष उज्वला हजारे, कर्जत विधानसभा महिला युवती संघटक प्रतिक्षा लाड, शहर अध्यक्षा स्मिता पतंगे, शहर अध्यक्ष नंदकुमार लाड, शेकाप चे सुधीर कांबळे, स्वीटी बार्शी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राजेश लाड, विद्यमान नगरसेवक, नगरसेविका आदी सह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचार फेरी दरम्यान त्यांनी मतदारांची भेट घेतल्या, आमदार सुरेशभाऊ लाड यांना मत म्हणजे कर्जत विधानसभा मतदार संघात शांततेला मत, आपला हक्काचा माणूस, आमदार असून जमीन राहणार माणूस, सर्वांच्या सुख दुखत मिसळणार माणूस, माता भिगिनींचा आदर करणारा माणूस, अश्या शांततामय संयमी आमदार सुरेशभाऊ लाड यांनाच विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
कोकण दर्पण




