Press "Enter" to skip to content

उरण विधानसभा : शेकाप महाआघाडीचे विवेक पाटील यांचे गावोगावी प्रचार दौरे !

उरण, कोकण दर्पण वृत्तसेवा : १९० उरण विधानसभा मतदार संघातील शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार विवेक पाटील यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या गाव दौरे अंतर्गत कोल्ही कोपर येथे बैठक संपन्न झाली. आगामी निवडणुकीत साहेबांच्या विजया करता क्षणाचीही उसंत न घेता घराघरात जाऊन विवेक पाटील यांनी केलेल्या विधायक कामांचा लेखाजोखा मांडणार अशा भावना येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

विवेक पाटील यांना प्रचार दरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनता रस्त्यावर उतरून विवेक पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देत आहेत.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »