Press "Enter" to skip to content

‘एकच वादा प्रशांतदादा’ने दुमदुमली गावे ! प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आज (बुधवार, दिनांक ०९) धानसर येथून सुरु झालेल्या प्रचार दौऱ्याला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विजयाची हॅट्रीक करण्यासाठी सज्ज असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल मतदार संघाचा केलेला विकास पाहता एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळविण्यासाठी कार्यकर्ते व पनवेलकर सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने आज धानसर, किरवली, धरणा, धरणाकॅम्प, रोहींजण, पिसार्वे, तुर्भे, करवले, तळोजा मजकूर, पेठाली, पाचनंद, पापडीचापाडा, खुटारी, ओवे असा प्रचार दौरा होता. ‘एकच वादा प्रशांतदादा’ घोषणेने पनवेल विधानसभा मतदार संघातील गावोगाव दणाणून सोडले जात असून विकासाचा झंझावात कायम ठेवून पनेवलला सर्वांगिण विकासाचे रूप देणारे विकासपुरूष व भाजपाचे उमेदवार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात आघाडी मारली आहे.
हजारो रूपयांची विकासकामे करून पनवेलच्या जनतेला सोयी सुविधा देण्याचे आणि पनवेलसह राज्यातील विविध प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. त्यामुळे प्रचार दौऱ्याच्यावेळी विकासपुरूष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्वागतासाठी गावांच्या प्रवेशव्दारावर ग्रामस्थांची गर्दी पहायला मिळत होती. कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयजयकार करून जोरदार स्वागत होत असताना चौका-चौकात महिलांकडून आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांचे औंक्षण केले जात होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठांना नम्रपणे नमस्कार करून त्यांचे आशिर्वाद घेतले. या प्रचार दौऱ्यात महापौर डॉ. कविता चौतमोल, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, सुभाष कदम, नगरसेवक संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, प्रभाकर जोशी, युवा नेते नंदकुमार म्हात्रे, ऍड. इर्शाद शेख, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोकण दर्पण