Press "Enter" to skip to content

अशोक गावडे यांनी साधला व्यापारी आणि माथाडी कामगारांशी संवाद !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी एपीएमसी मार्केट मधील व्यापारी आणि माथाडी कामगारांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

यावेळी अशोक गावडे म्हणाले ए.पी.एम.सी मार्केट तुर्भे सेक्टर -१९ ,ज्या भाजीपाला मार्केट मध्ये मी वाढलो, ज्या व्यापाऱ्यांच्या सोबतीने व्यवसाय हा मोठ्या उंचीवर नेला, अशा मुंबई कृषि उत्तपन्न बाजार समिती वाशी या ठिकाणी सर्व व्यापारी आणि माथाडी कामगारांशी संवाद साधताना मला समाधान वाटत आहे. माझा अनेक वर्षांपासूनचा ऋणानुबंध या व्यापार क्षेत्राशी आहे. या ठिकाणचे सर्व व्यापारी आणि माथाडी कामगार माझ्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझ्याशी संबंद्धीत आहेत. आज या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या समस्या याची मला जाणीव आहे असे देखील गावडे यांनी यावेळी नमूद केले. येणाऱ्या काळात मी, येथे असलेल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करील, असे गावडे यांनी आश्वासित केले.
या ठिकाणी भाजीपाला मार्केटचे माजी संचालक प्रतिष्ठित व्यापारी शंकरशेठ पिंगळे,त्याच प्रमाणे काशीनाथ शेठ मोरे किरण झोड़गे , प्रशांतजी पाटील , इतर सर्व प्रतिष्ठित APMC मधला व्यापारी वर्ग उपस्थित होता.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »