नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : मुस्लिम समाज बांधव राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय शरद पवार यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे , त्यामुळे बेलापूर मतदार संघातून राष्ट्रवादीचाच विजय निश्चित आहे, असा विश्वास बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
अशोक गावडे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याची सुरुवात झाली आहे. आज त्यांनी नेरुळ सेक्टर १५ येथील जामा मशीद परिसरात मुस्लिम समाज बांधवांशी चर्चा केली. मोठ्या आपुलकीने अशोक गावडे यांनी समाजाची चौकशी केली. मुस्लिम समाज बांधवानी देखील मोठ्या आपुलकीने अशोक गावडे यांचे स्वागत केले. यावेळी खऱ्या अर्थाने माणुसकी धर्माचे दर्शन घडले.
नवी मुंबई राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष हाकिम सय्यद आणि रहमान सय्यद यांच्या सोबतीने नेरुळ सेक्टर १५ येथील जामा मशीद परिसरात आज जोरदार प्रचार झाला. मुस्लिम समाजाच्या न्यायहक्कासाठी मी सदैव समाजाच्या सोबत असल्याचे प्रतिपादन अशोक गावडे यांनी यावेळी केले.
कोकण दर्पण.





