Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : राष्ट्रवादी महाआघाडीचे अशोक गावडे यांना सिवुड्स – दारावे मधून उत्स्फूर्त प्रतिसाद !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांची आज सिवुड्स – दारावे मधून निघालेली प्रचार रॅली अभूतपूर्व ठरली .सिवुड्स – दारावे परिसरातील जनतेने अशोक गावडे यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे विजयाच्या दिशेने एक पाऊल म्हटले जात आहे.

प्रचार रॅली दरम्यान अशोक गावडे यांनी नागरिकांचे प्रश्न देखील जाणून घेतले. प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. मात्र , राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांना जनता रस्त्यावर उतरून प्रतिसाद देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »