Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : राष्ट्रवादी महाआघाडीचे अशोक गावडे यांच्या प्रचाराचा बेलापूरमध्ये झंझावात ! नागरिकांनी केले जोरदार स्वागत !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांचा बेलापूरमध्ये झंझावती प्रचार झाला. नागरिकांनी अशोक गावडे यांचे जोरदार स्वागत करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

गुरुवारी झालेल्या प्रचारादरम्यान अशोक गावडे यांनी बेलापूर, दिवाळे गाव या भागात प्रचारार्थ पदयात्रा काढली. यावेळी गावडे यांनी सर्व जनतेचे मनोगत जाणून घेतले. बेलापूर मतदार संघाच्या विकासाठी मी कटिबद्ध आहे, असे गावडे यांनी जनतेला आश्वासित केले.

बेलापूरच्या विकासाला गती देण्यासाठी जनता सज्ज आहे . या भागात फिरत असतांना लोकांच्या मनात परिवर्तन करण्याची ईच्छा दिसून आली. लोकांनी भेटीगाठीसाठी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास यावर नक्कीच बेलापूर विधानसभा मतदार संघात परिवर्तन होईल, असा विश्वास अशोक गावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »