Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : राष्ट्रवादीचे अशोक गावडे यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांच्या प्रचाराचा आज (दि. ८ ऑक्टोबर )नेरूळमध्ये जोरदार शुभारंभ झाला. विजयादशमीच्या औचित्य साधुन अशोक गावडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. राष्ट्रवादीचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या शुभहस्ते आणि काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरुळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयातून प्रचाराचा आरंभ करण्यात आला.
प्रचाराच्या शुभारंभानंतर नेरुळ पश्चिम आणि परिसरात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी नेरुळ परिसरातील जनतेच्या शुभेच्छा घेतल्या. नागरिकांनी देखील अशोक गावडे यांच्या प्रचार रॅलीचे उत्साहाने स्वागत केले. आजच्या झंझावाती प्रचार आरंभामुळे कार्यकर्ते देखील जोरदार कामाला लागले आहेत.

कोकण दर्पण.

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »