दापोली ,कोकण दर्पण वृत्तसेवा : दापोली विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संजय कदम आणि शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यात खरी लढत होणार आहे. योगेश कदम हे मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव असल्याने या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. दापोली मतदार संघातील निवडणूक हि संजय कदम आणि योगेश कदम यांच्यात असली तरी रामदास कदम यांच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे दापोली मतदार संघात मोठी टक्कर होण्याची शक्यता आहे.
संजय कदमहे राष्ट्रवादीचे विध्यमान आमदार आहेत.त्यांनी दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यात कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार केली आहे,तर दापोली हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता किसने कितना है दम हे निवडणुकीत स्पष्ट होईलच.
दापोली विधानसभा क्षेत्रात विकासाचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. पर्यटन,बंदर ,रस्ते ,शेती याबाबतचा विकास करणारी धोरणे राबविणार आमदार जनतेला हवा आहे. आता कोण खरा ठरतो ,हे लवकरच स्पष्ट होईल.


कोकण दर्पण.





