Press "Enter" to skip to content

ऐरोली विधानसभा : वंचितचे डॉ प्रकाश ढोकणे निवडणुकीच्या रिंगणात !

नवी मुंबई,कोकण दर्पण वृत्तसेवा : ऐरोली विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे डॉ प्रकाश ढोकणे निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला.
डॉ प्रकाश ढोकणे हे अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत. डॉ प्रकाश ढोकणे हे डॉक्टर्स वेल्फर असोसिएशन,विदर्भ माली संस्था,अखिल भारतीय माली संघाचे अध्यक्ष आहेत. तर,सत्यशोधक ओबीसी परिषदेचे उपाध्यक्ष आहेत . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामविस्तार संयोजक , सत्यशोधक महासंघाचे सरचिटणीस , विदर्भ समाज संघ नवी मुंबईचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. डॉ ढोकणे हे अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत. ऐरोली मतदार संघ हा वंचितसाठी पोषक मानला जातो त्यामुळे ऐरोली मतदार संघात राजकीय समीकरणे बदलती ,अशी चर्चा आहे.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »