
पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेलमध्ये शेकापने विजयाचा निर्धार करून भव्य रॅली काढून शेकाप आघाडीचे उमेदवार हरेश केणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. शेकापच्या भव्य रॅलीने पनवेल लाल बावटामय झाले. यावेळी शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकापचे नेते काशिनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल येथील शेकाप कार्यालयातून रॅली आरंभ झाली. शेकापच्या घोषणांनी पनवेल दुमदुमून गेले.पनवेलच्या विकासासाठी जनता सत्ता परिवर्तन करून आणेल,असा विश्वास हरेश केणी यांनी व्यक्त केला. आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांनी काही केले नाही,सिडको अध्यक्ष म्हणून देखील त्यांची कारकीर्द चांगली नाही ,त्यामुळे जनता त्यांना धडा शिकवेल,असा टोला यावेळी आमदार बाळारामपाटीलयांनी लगावला.
कोकण दर्पण .

पनवेलमध्ये शेकापने केला विजयाचा निर्धार ! भव्य रॅली काढून हरेश केणी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज !
More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »
- सेवेत समर्पित, ‘विजय’ निश्चित..!
- गणेशोत्सव निमित्त दिल्या जाणाऱ्या टोल माफीचा सरकारला पडला विसर !
- पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
- समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम




