Press "Enter" to skip to content

कर्जत विधानसभा : वंचित बहुजन आघाडीचे अकरम खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

कर्जत, कोकण दर्पण वृत्तसेवा : कर्जत विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हाजी अकरम खान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल शुक्रवारी दाखल केला. कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
एमआयएमच्या कोकण विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेले खान यांचे वंचित सोबत चांगले ऋणानुबंध असल्याने आणि कर्जत खोपोली मध्ये कार्यरत असल्याने वंचितने खान यांना उमेदवारी दिली. खान यांच्या उमेद्वारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
कर्जत खोपोली आणि नेरळ मध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाचा टक्का आहे. त्यामुळे खान हे सर्व या मतदार संघातून विरोधकांना चांगली टक्कर देतील असे चित्र आहे.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »