Press "Enter" to skip to content

पनवेल विधानसभा : जोरदार शक्तीप्रदर्शन करीत प्रशांत ठाकूर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज !


पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारॊ कार्यकर्त्यांची साक्ष म्हणजेच अर्ज दाखल नव्हे तर जणू विजयी रॅली असल्याचे चित्र दिसत होते. रखरखत्या उन्हातही कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह तेजस्वीपणे दिसत होता. आपल्या सर्वांचा लाडका आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर पुन्हा आमदार होणार आणि विकासाचा आलेख उंचावतच राहणार याचा अभिमान त्यांच्या आनंदात ओसांडून वाहताना दिसत होता.
जागोजागी स्वागत, अभिनंदन, औक्षण आणि दिबासाहेबांचे आशिर्वाद !
आमदार प्रशांत ठाकूर उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना त्यांचे जागोजागी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत, अभिनंदन आणि औक्षण केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठांचे आशिर्वादही घेतले. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी दिबा साहेबांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

निवडणुकीची आदर्श आचारसंहिता पाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास’ या अनुषंगाने देशाच्या विकासासाठी काम करीत असून शहराबरोबरच ग्रामिण भागाचाही झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे हे सरकार आपल्यासाठी काम करीत आहे हि भावना जनतेत झाली आहे. प्रचारासाठी दिवस कमी राहिले आहेत, सहकारी म्हणून तुम्ही मला साथ द्याल, घरोघरी जाऊन प्रचार करा. निवडणुकीत आपल्याला बदनाम करण्याचे, खोटे नाटे आरोप करण्याचे काम विरोधक करतील त्यामुळे सर्वानी दक्ष रहावे. आपल्याला निवडणुकीची आदर्श आचारसंहिता पाळून काम करायचे आहे. आपल्या सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवा.
– आमदार प्रशांत ठाकूर

कोकण दर्पण.