Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज !

बेलापूर विधानसभा : भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघातील भाजप – शिवसेना-आरपीआय युतीच्या उमेदवार आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सागर नाईक, संपत शेवाळे, मारुती भोईर, नितीन कंधारी आदी उपस्थित होते. भव्य रॅली काढत कोकण भवन येथे कोकण आयुक्तांकडे आपल्या भाजपच्या उमेदवारीसाठीचा अर्ज आमदार मंदाताई यांनी दाखल केला.
बेलापूर विधानसभा मतदार संघात भाजप -शिवसेना युतीचे तिकीट कोणाला यासाठी मोठी रस्सीखेच सुरु होती.युतीत भाजपच्या वाट्याला असलेला बेलापूर मतदार संघात माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे तिकीट वाटपाचे मोठे गुपित बनले होते. अखेच्या क्षणाला मंदाताई यांनी उमेदवारी मिळविली. आज मोठ्या धुमधडाक्यात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोकण दर्पण .