Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादीचे बेलापूरमध्ये शक्तिप्रदर्शन ! भव्य रॅलीने कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह !

नवी मुंबई , कोकण दर्पण वृत्तसेवा : कोणत्याही नेत्याने कितीही बंडाळी केली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता राष्ट्रवादीला मोठी करण्यासाठी सक्षम आहे , खंबीर आहे. हे पुन्हा एकदा नवी मुंबई राष्ट्रवादीने दाखवून दिले आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेरुळ नवी मुंबई येथे झालेल्या भव्य कार्यकर्ता मेळाव्यानंतर आज भव्य रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने पुन्हा आपली ताकत दाखवून दिली .रॅली द्वारे बेलापूरमध्ये भव्य शक्तिप्रदर्शन करीत आज राष्ट्रवादी- काँग्रेस -आरपीय आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.आजच्या भव्य रॅलीने नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला हे मात्र नक्की आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नेरुळ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयातून चार चाकी आणि दुचाकी वाहनांचा ताफा बेलापूरच्या दिशेने निघाला. घोषणांच्या गर्जनेमध्ये नेरुळ, बेलापूच नव्हे तर अक्खी नवी मुंबई दुमदुमली. सीबीडी सेक्टर १५ येथून जनतेच्या शुभेच्या घेत अशोक गावडे पदयात्रेद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोकण भवनकडे रवाना झाले.

कोकण दर्पण .

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »