Press "Enter" to skip to content

बेलापूर विधानसभा : राष्ट्रवादीचे अशोक गावडे ३ ऑक्टोबर रोजी भरणार उमेदवारी अर्ज !

नवी मुंबई, कोकण दर्पण वृत्तसेवा : बेलापूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस – कांग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे ३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी दाखल करताना राष्ट्रवादी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे.
नवी मुंबईतील बेलापूर हा मूळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मात्र, नवी मुंबईतील राजकीय बदलामुळे एक मोठे आव्हान राष्ट्रवादी पुढे उभे ठाकले. माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्या खांद्यावर शरद पवार यांनी जबाबदारी दिली. अशोक गावडे यांनी जबाबदारी स्वीकारून पक्षाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी स्वतः बेलापूर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

कोकण दर्पण

More from Navi MumbaiMore posts in Navi Mumbai »