कल्याण , कोकण दर्पण वृत्तसेवा : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजपकडून आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणपत गायकवाड हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गायकवाड हॅट्रिक मारतील का ? याबाबत कल्याणकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.३ ओक्टोम्बर रोजी गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे , अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त केली .
कोकण दर्पण
.





