पनवेल, कोकण दर्पण वृत्तसेवा : शेकापचे खारघर ग्रामपंचायतीतील माजी उपसरपंच सोमनाथ म्हात्रे यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित खारघर येथे सदर पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजप नेते वाय टी देशमुख , सभापती अभिमन्यू पाटील , शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सभापती शत्रुघन काकडे , नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेवक निलेश बाविस्कर, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, भाजप नेते अमर उपाध्याय , ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव आर के दिवाकर , नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक रामजी बेरा ,सोशल मीडिया अध्यक्ष गुरुनाथ म्हात्रे, भाजप नेते प्रभाकर जोशी, ऍड संध्या सहा शारबिद्रे , भाजप नेते मनोज शारबिद्रे ,नगरसेविका अनिता पाटील, नगरसेविका आरती नवघरे , भाजप नेते कीर्ती नवघरे , माजी उपसरपंच संजय घरत आदी उपस्थित होते.
कोकण दर्पण.





